Monday, December 15, 2014

स्वार्थ

माणूस जन्मापासून मरेपर्यंत आपला स्वार्थच नेहमी जपत असतो.

लहान बाळाला जेव्हा भूक लागते तेव्हा त्याला आई आठवते. भूक भागल्यावर तो पुन्हा खेळात मस्ती मध्ये मग्न होतो.

आई वडील मुलाच्या सगळ्या गरजा पुरवतात, त्याला मोठं करतात, कुठेतरी हा स्वार्थ असतो कि मोठा होऊन मुलगा आपली काळजी घेईल.

आपण रोज देवापुढे हाथ जोडतो, त्या मागे पण आपला स्वार्थ असतो. देवाला काय गरज लोकांनी त्याच्यासमोर हाथ जोडण्याची?

इतकाच काय, आपण जरी कोणा गरजू व्यक्तीला मदत करत असलो, तो सुद्धा आपला स्वार्थ आहे कारण आपल्याला ते आवडतं म्हणून आपण ते करतो.

थोडक्यात काय, आपण जे काही करतो के फक्त आणि फक्त आपल्या स्वार्थ पोटी.

निस्वार्थ भावना हि मुळात सामान्य माणसामध्ये नसतेच असे मला वाटते.

म्हणून लक्षात घ्या, आपण जे काही समाज कल्याणासाठी, लोकांच्या चांगल्या साठी करतो, ते खरं तर आपल्याच स्वार्थ साठी असते आणि असल्या कार्याचा उगाच अभिमान बाळगू नये. आपलं काम फक्त कार्य करण्याचे आहे जे आपल्याला आवडते आणि ते करत राहावे. बाकी सगळं वरती बसलेल्यावर सोडावे.

1 comment: