Monday, December 15, 2014

स्वार्थ

माणूस जन्मापासून मरेपर्यंत आपला स्वार्थच नेहमी जपत असतो.

लहान बाळाला जेव्हा भूक लागते तेव्हा त्याला आई आठवते. भूक भागल्यावर तो पुन्हा खेळात मस्ती मध्ये मग्न होतो.

आई वडील मुलाच्या सगळ्या गरजा पुरवतात, त्याला मोठं करतात, कुठेतरी हा स्वार्थ असतो कि मोठा होऊन मुलगा आपली काळजी घेईल.

आपण रोज देवापुढे हाथ जोडतो, त्या मागे पण आपला स्वार्थ असतो. देवाला काय गरज लोकांनी त्याच्यासमोर हाथ जोडण्याची?

इतकाच काय, आपण जरी कोणा गरजू व्यक्तीला मदत करत असलो, तो सुद्धा आपला स्वार्थ आहे कारण आपल्याला ते आवडतं म्हणून आपण ते करतो.

थोडक्यात काय, आपण जे काही करतो के फक्त आणि फक्त आपल्या स्वार्थ पोटी.

निस्वार्थ भावना हि मुळात सामान्य माणसामध्ये नसतेच असे मला वाटते.

म्हणून लक्षात घ्या, आपण जे काही समाज कल्याणासाठी, लोकांच्या चांगल्या साठी करतो, ते खरं तर आपल्याच स्वार्थ साठी असते आणि असल्या कार्याचा उगाच अभिमान बाळगू नये. आपलं काम फक्त कार्य करण्याचे आहे जे आपल्याला आवडते आणि ते करत राहावे. बाकी सगळं वरती बसलेल्यावर सोडावे.

Sunday, December 14, 2014

मंथन

मंथन म्हंटले कि आठवते ते 'समुद्र मंथन', जे देवांनी आणि असुरांनी 'अमृत' मिळवण्यासाठी केले होते. ह्या गोष्टीचा आपण जरा आपल्या जीवनाशी संबंध लावू या. जेव्हा आपण दुखी असतो, मन अशांत असतं, तेव्हा आपल्याला जाणवत कि आपल्या मनात खूप काही उथल पुथल चालू आहे. हि उथल पुथल असते ती सुखाच्या क्षणांची आणि दुखाच्या क्षणांची झालेली घालमेल. ह्या घालमेलीतून बरेच अमुल्य रत्न बाहेर पडत असतात जे आपल्याला कधी कळतात तर कधी कळत नाहीत. आता हि रत्ने कळली तर माणूस वळतो नाही तर दुखात गळतो. सांगायचे तात्पर्य असे कि, कोणते हि रत्न प्राप्ती साठी दुखाची आणि सुखाची सांगड असणे आवश्यक असते, नाही तर मंथन शक्यच होत नाही.

हे रत्न ओळखणे हि त्या व्यक्ती वर अवलंबून आहे, तिच्या विचारसरणी वर अवलंबून आहे. आपण स्वतःला किती प्रश्न विचारतो? कधी आपण स्वतःला विचारतो: आपण कोण आहोत? कशासाठी ह्या भूतलावर आलोत? आपला इथे काम काय आहे? फक्त पैसे कमावणं आणि संसार थाटण? आपण दुखासाठी नेहमी नशिबाला दोष देतो. वेग वेगळे उपाय करतो, जेणेकरून दुख आपल्या पोटी नको यायला. आपण सगळीकडे फिरतो, कोणा कोणाचे पाय धरतो, पण कधी आपल्या आत बघत नाही. म्हणून आपल्याला हि रत्ने मिळत नाहीत आणि आपण नेहमी दुखीच राहतो.